भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापा न घाली अन्न । बाईलेच्या गोता संतर्पण

mayabapa na ghali anna | bailechya gota santarpan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मायबापा न घाली अन्न । बाईलेच्या गोता संतर्पण ॥१॥ मायबापा नसे लंगोटी । बाइलेच्या गोता नेसवी धट्टी ॥२॥ मायबापान मिळे गुंजभर सोनें । बाइलेच्या गोता उडी अळंकार लेणें ॥३॥ मायबापें श्रमोनियां मेलीं । एका जनार्दनीं बाईल प्रिय जाहली ॥४॥