भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळां पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें तें वायां बोलताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळवोनी पांच सात गडी मेळी । डाव खेळती चेंडुफळी ॥१॥ खेळ चेंडुंचाझेला रे झेला बाळा । विचारुन खेळ खेळां न पडुं प्रवाही काळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि गोपाळ सकळीं । यमुनेतटीं खेळे चेंडुफळीं । गाई बैसविल्या कळंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥ रुप ते सांवळें सुंदर सोभलें । गळां मिरवलें तुळशीहार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें ॥१॥ देखत देखत घेतसे विख । अंतीं तें सुख केवीं होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥ या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी ब्रह्मा जाहलों म्हणें अंतरीं ब्रह्मा नव्हें ऐसें कांहीं । ब्रह्माविण अनु न दिसे कोठें । तितुकें ब्रह्मा पाहीं ॥१॥ होय नाहीं ऐसा संशयचि नाहीं निश्चयेंसी तेंचि आहे । आहे तेंचि ब्रह्मा नाहीं तेंचि ब्रह्मा अवघेंचि ब्रह्मा पाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी माझें आणि तुझें । टाकी परतें हें वोझें । नामें पावन होसी सहजें । तेंचि सेवीं आवडीं ॥१॥ नको गुंतूं या लिगाडा । सोडी सोडी या दगडा । भवबंधनाचा हुडा । पडेल अंगावरुता ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी मी म्हणतां अवघें मी जालों । तूंपणाचा बोला लाजूनियां ठेलों ॥१॥ मी ना कोणाचा ना माझें कोणी । एकुविण एकु सहज निर्वाणीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती ॥१॥ मजलागीं मी तो म्यां भेटावें तें कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी मी म्हणतां वायां गेलें सर्व । पाहे तूं अपूर्व नवल बापा ॥१॥ रावण नासला मीपणें गेला । रामें क्षय केला पुत्रापौत्रीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ