भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां

mi to daridri nahin javali dravya | kaisa taranopay hoy atan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥ या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥ आमुचा घराचार येणें बुडविला । पोर फ़ितविला काय करुं ॥३॥ या विठोबाचा येणें धरिलासे छंद । आमुचें जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥ एका जनार्दनीं कोणा सांगूं गुज । कोण आहे मज जीवलग ॥५॥