भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये

miloni bara sola ghokani ghokiti | to hi shripati pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥ रुप ते सांवळें सुंदर सोभलें । गळां मिरवलें तुळशीहार ॥२॥ मुगुट कुंडलें वैजयंती माळ । कौस्तुभ झळाळ हृदयावरीं ॥३॥ शंख चक्र करीं दोन्हीं ते मिरवले । सुंदर शोभले वाळरुप ॥४॥ एका जनार्दनीं हृदयीं श्रीवत्सलांछन । वागवी भूषण भक्तांसाठी ॥५॥