भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी

miloni abala baisati parasadvari | yere yere krushna mhanoni bahati vrajanari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळोनि अबळा बैसती परसद्वारी । येरे येरे कृष्णा म्हणोनि बाहाती व्रजनारी ॥१॥ ऐशा लांचावल्या नंदनंदना । घरींच बैसती लक्ष लावीत कान्हा ॥२॥ वेदश्रुतीसी न कळे जयांची शुद्धी । तो नवनीत खावया लाहे लाहे घरामाधी ॥३॥ एका जनार्दनी ब्रह्मा परिपूर्ण । पूर्ण वेधे वेधिलें आमुचे मनाचें मन ॥४॥