भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती

mi mi mhanatan majhen mich mi nenen | chukali ravikiranen surya dhunditi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी मी म्हणतां माझें मीच मी नेणें । चुकली रविकिरणें सुर्या धुंडिती ॥१॥ मजलागीं मी तो म्यां भेटावें तें कैंसें । दीपप्रभा पुसे दीपकासी ॥२॥ सबाह्म अभ्यंतरीं गगन सावकाश । तैसें घटावकाश महदाकाशी ॥३॥ एका जनार्दनीं एकत्वें जन वन । जन आम्हां दिसे जनार्दन ॥४॥