भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं

miloni dhamakati dahin dudh te khati | mi khelatan rajabindin gharant netin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥ न झांकितां डोळे लोणी देती । मजसी खादलें म्हणोनि सांगती तुजासी ॥३॥ एका जनार्दनी बोलतां हांसतीं बाळा । रागावुनी मग बोला बोलती सकळां ॥४॥