भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटीं

mithya mayechya dhakasathin | yogi rigale kapatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटीं ॥१॥ आसन घालूनियां जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥ क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख ॥३॥ बुद्धी सुबुद्धि धरूनि हातीं । आकळितसे इंद्रियवृत्ती ॥४॥ शांतीचेनि बळें । संकल्प त्यागिले सकळ ॥५॥ ऐशी योगाची कहाणी । शरण एका जनार्दनीं ॥६॥