भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी

mayabap tumhi sant | mi patit kinv bhaki

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मायबाप तुम्ही संत । मी पतित कींव भाकी ॥१॥ करा माझें समाधान । अभय वचन देउनी ॥२॥ मागें तारिलें सकळ । उत्तम अधम चांडाळ ॥३॥ तोचि आहे अनुभव । म्हणोनि कींव भाकितसे ॥४॥ एका जनार्दनीं शरण । मज पावन करावें ॥५॥