भजनी मालिका
← भजनांकडे परत

मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें

milati gaulani daravatin baisati | dharun atan nishchiti gharamadhyen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरुं आतां निश्चिती घरामध्यें ॥१॥ येतो जातो हें न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥ पांच सात बारा होऊनियां गोळा । बैसती सकळां टकमक ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तयां । योगी ध्याती जया अहर्निशीं ॥४॥