भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृगजळ जेथें नसे । तेथें वसे कोरडें

mrugajal jethen nase | tethen vase koraden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मृगजळ जेथें नसे । तेथें वसे कोरडें ॥१॥ ऐसा घ्यावा अनुभव । पदोपदीं भाव जीवासी ॥२॥ जे दिसें ते नासे । ऐसें असे सर्वत्र ॥३॥ यापरी जाणावें मिथ्यापण । शरण एका जनार्दन ॥४॥