भजनी मालिका
← भजनांकडे परत

मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ

murti chaturbhuj velhal | shankh chakra gada kamal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥ मुकुट शोभे कटीं मेखळा । कांसे मिरवें सोनसळा ॥२॥ कौस्तुभ वैजयंती माळ । अकार्णा नयन विशाळ भाळ ॥३॥ ऐसा सुंदर सांवळा । एका जनार्दनी पाहें डोळा ॥४॥