भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची

melavoni mela gopalancha hari | nighe karavaya chori gorasachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥ ठेवियलें लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥ एका जनार्दनीं तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिकां ॥४॥