भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ

yenenchi namen tarilen bahutan | doshi to purata ajamel

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणेंचि नामें तारिलें बहुतां । दोषी तो पुरता अजामेळ ॥१॥ गणिका आणि वाला अजामेळ भिल्लणी । गोपाळ गौळणी तारियेल्या ॥२॥ गजेंद्र तो पशु नाडितां जळचर । धांवे देव सत्वरें ब्रीदासाठीं ॥३॥ प्रल्हाद संकट पडता निवारी । चोखयाचें करी बाळंतपण ॥४॥ दामाजीचा महार होऊनियां ठेला । उणेंपण त्याला येवों नेदी ॥५॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । उभाचि तिष्ठत विटेवरी ॥६॥