भजनी मालिका
← भजनांकडे परत

येऊनियां पंढरपुरा । उभा सामोरा पुडलिका

yeuniyan pandharapura | ubha samora pudalika

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येऊनियां पंढरपुरा । उभा सामोरा पुडलिका ॥१॥ उभारुनी बाह्मा हात । भक्ता इच्छिलें तें देत ॥२॥ भलते याती नारी नर । दरुशनें उद्धार सर्वांसी ॥३॥ साक्ष भीमरथी आई । एका जनार्दनीं पाही ॥४॥