भजनी मालिका

भजने

मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित ॥१॥ भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरियाप्रती कर आले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥ राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥१॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी याचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उपदेशिलें ॥१॥ सनकसनदंन अत्रि कपिलमुनी । नारदादि शिरोमणी भक्तराज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फळ तथोनियां ॥१॥ हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा