भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उपदेशिलें

mukhya adinath pranavachen nij | parvatiten bij upadeshilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उपदेशिलें ॥१॥ सनकसनदंन अत्रि कपिलमुनी । नारदादि शिरोमणी भक्तराज ॥२॥ व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । ध्रुव प्रल्हाद देख शिरोमणी ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचें महिमान । स्वयें नारायण वाढवीत ॥४॥