भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें

mukhya adhin vishayatyag | vidhibhag palanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥ मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥ उदासीन वृत्ति देहीं । चाड नाहीं पाळणें ॥२॥ तुका म्हणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥३॥