भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख्य पाहिजे अनुताप । हेंचि वैराग्याचें रूप

mukhya pahije anutap | henchi vairagyachen rup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुख्य पाहिजे अनुताप । हेंचि वैराग्याचें रूप ॥१॥ कोरड्या त्या ज्ञानगोष्टी । अनुताप नाहीं पोटीं ॥२॥ अनुतापाविण ज्ञान । कदा नोहे समाधान ॥३॥ एका जनार्दनीं तप । अनुताप हेंचि देख ॥४॥