भजनी मालिका

भजने

नाम तें उत्तम नाम तें सगुण । नाम तें निर्गुण सनातन ॥१॥ नाम तें ध्यान नाम तें धारणा । नाम तें हेंजना तारक नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तें ब्रह्मा नाम तें ब्रह्मा । नामापाशीं नाहीं कर्म विकर्म ॥१॥ अबद्ध पढतां वेद बाधी निषिद्ध । अबद्ध नाम रटतां प्राणी होती शुद्ध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तें सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती ॥१॥ जपें तूं आवडी धरुनियां गोडी । युगाऐसीं धडी करुनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तें सोपें पद्मनाभ पाठ । करी तूं बोभाट दिवसनिशीं ॥१॥ चौसष्ट घडियामाजीं जपें नामावली । कळिकाळ टाळी मारुं न शके ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तें सोपें संकर्षण जपे । आणिक संकल्पें धरुं नको ॥१॥ धरितां संकल्प नाशिवंत बापा । नाम जप सोपा मंत्रमार्ग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम तेंचि रुप रुप तेंचि नाम । नामरुप भिन्न नाहीं नाहीं ॥१॥ देव आकारला नामरुपा आला । म्हणोनि स्थापिला नामवेदीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाम नारसिंह नाम नारसिंह । भक्तांसी तो सम सर्वकाळ ॥१॥ जपे तो प्रल्हाद आवडी तें नाम । पावला सर्वोत्तम तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पाहतां डोळां ॥१॥ संसार सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गातां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥ तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती श्रीहरींच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाम पावन पावन । नाम दोषांसि दहन । नाम पतीतपावन । कलीमाजीं उद्धार ॥१॥ गातां नित्य हरिकथा । पावन होय श्रोता वक्ता । नाम गाऊनि टाळी वाहतां । नित्य मुक्त प्राणी तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ