भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम प्रल्हाद उच्चारी

nam pralhad uchchari

नाम प्रल्हाद उच्चारी । तया सोडवी नरहरी । उचलुनि घेतला कडियेवरी । भक्तसुखें निवाला ॥१॥ नाम बरवया बरवंट नाम पवित्र चोखट । नाम स्मरे नीळकंठ निजसुखें निवाला ॥२॥ जें ध्रुवासी आठवले । तेचि उपमन्यें घोकिलें । तेंचि गजेंद्रा लाधलें । हित जालें तयांचे ॥३॥ नाम स्मरे अजामेळ । महापातकी चांडाळ । नामें जाला सोज्वळ । आपण्यासहित निवाला ॥४॥ वाटपाडा कोळिकु । नाम स्मरे वाल्मिकु । नामें उध्दरिलें तिन्ही लोकु । आपणासहित निवाला ॥५॥ ऐसें अनंत अपार । नामें तरले चराचर । नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेविवराचें ॥६॥