भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम फुकट चोखटे । नाम घेतां नये वीट

nam phukat chokhate | nam ghetan naye vit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम फुकट चोखटे । नाम घेतां नये वीट ॥१॥ जड शिळा ज्या सागरीं । आत्मारामें नामें तारी ॥२॥ पुत्रभावें स्मरण केलें । तया बैकुंठासी नेलें ॥३॥ नाममहिमा जनी जाणे । ध्यातां विठठलचि होणें ॥४॥