भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे

nam pavitra ani parikar | namen tarale doshi apar | namen henchi nijasar | adhar vedashastranche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम पवित्र आणि परिकर । नामें तरले दोषी अपार । नामें हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥ तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामें तरती श्रीहरींच्या ॥२॥ मनीं माझ्या ऐक गोष्टी । नाम जपेंतुं सदा कंठीं । एका जनार्दनीं परिपाठीं । नाहीं गोष्टीं दुसरी ॥३॥