भजनी मालिका

भजने

नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं घनदाट ॥१॥ पाताळ फोडोनि किती आहे पुड । नाहीं आंत वाड नभ वरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नांदतसें नाम आकाश पाताळीं ।सर्व भुमंडळीं व्याप्त असे ॥१॥ पाताळ भेदोनी व्याप्त ठेलें पुढें । नाहीं त्यासी आड कोठें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाना अवतार घेशी भक्तासाठीं । कृपाळु जगजेठी म्हनोनियां ॥१॥ मत्स्य कूर्मरुप धरुनियां देवा । साधिलें केशवा भक्तकाज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाना अवतार धरिले जेणें । दैत्यांसी उणें आणियेलें ॥१॥ तो हा संताचिये भारी । उभा तीरीं चंद्रभागे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाना कर्माचियां लागतां पाठीं । भ्रमचि जगा होय शेवटीं ॥१॥ नोहे कर्म यथासांग वाउगाचि मग श्रम होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावें साचें अघहरणा ॥१॥ केशव माधव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ वाचे वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नाना दुःख माया आठवती मना । आतां नारायणा कृपा करी ॥१॥ माझ्या पातकांचा लागूं नेदी अंत । ऐसें माझें चित्त साक्ष असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाना मतांतरें शब्दाच्या व्युत्पत्ती । पाठांतरें होती वाचाळ ते ॥१॥ माझया विठोबाचे वर्म आहे दुरी । कैची तेथें उरी देहभावा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा