भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाद ब्रह्म मुसे नादरुप वसे

nad brahma muse nadarup vase

रचनाकार: संत सोपान · अभंग
नाद ब्रह्म मुसे नादरुप वसे । तैसा जनी दिसे आत्मपणे ।।१।। बाहेर साबडा आम्हा दिसे घड़ा । मातियेचा वेढा जीवनालागी ।।२।। तैसे हे शरीर आत्मपणे नीट । मन हे निकट बोखाळपणे ।।३।। सोपान साजिरे ब्रह्म ते गोजिरे । जीवन साकार ब्रह्म हेतु ॥४॥