भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही नेणो माया नेणो ते काया

amhi neno maya neno te kaya

रचनाकार: संत सोपान · अभंग
आम्ही नेणो माया नेणो ते काया । ब्रह्म लवलाह्या आम्हामाजी ।।१।। मी तू गेले ब्रह्मी मन गेले पूर्णी । वासना ते जनी ब्रह्म जाली ॥२॥ जीवशिवभाव आपणची देव । केला अनुभव गुरूमुखे ।।३॥ सोपान ब्रह्म वर्ततसे सम । प्रपंचाचा अम नाही नाही ॥४॥