भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीक ऐके गा दुता

anik aike ga duta

रचनाकार: संत सोपान · अभंग
आणीक ऐके गा दुता । जेथे रामनाम कथा तेथे करद्वय जोडूनी हनुमंता । सदासन्मुख असिजे ।।१।। रामनामी चाले घोष । तो धन्य देशु धन्य दिवसु । प्रेम कळा महा उल्हासु । जगन्निवासु विनवितुसे ।।२।। दिंड्या पताका मृदंग । टाळ घोळ नामे सुरंग । तेथे आपण पांडुरंग । भक्तसंगे नाचत ॥३॥ तथा भक्ता तिष्टती मुक्ती । पुरुषार्थ तरी नामे कीर्ति । रामनामी तया तृप्ती । ऐसे त्रिजगती यमु सांगत ।।४।। ज्या नामे शंकर निमाला। गणिका अजामेळ पद पावला। अहिल्येचा शाप दग्ध माला । तोची पान्हा दिवला पांडुरंगे ॥५॥ चित्रगुप्त म्हणती यमा । काय करावे गा धर्मा। लोक रातले रामनामा । पुरुषोत्तमा विठ्ठलदेवा ॥६॥ कलिकालासी दाटुगे नाम । रुखे घरीले मला प्रेम । त्रिभुवनी विस्तारीले सप्रेम । रामनाम उच्चारी यम तोही तरला जाणा ।७।। ऐसे नाम अगाध बीज । उच्यारी तो होय चतुर्भुज सोपान म्हणे है गुज । उमाशंकर देवाचे ॥८॥