भजनी मालिका
← भजनांकडे परत

नादबिंदकळाज्योति स्वरुपीं

nadabindakalajyoti svarupin

नादबिंदकळाज्योति स्वरुपीं विलया जाती । श्रुति नेति नेति म्हणती जेथें ॥१॥ नाहीं मज चाड सकळ उपाधी । एका मंगळनिधि वांचूनियां ॥२॥ श्रीरामीं रमतां मनु निवडितां नये तनु । सुखश्री सांगतां सिणु हारतु असे ॥३॥ पदापिंडा दाटणी रुपानिरुपा निरंजनी । विठ्ठला चरणीं ज्ञानदेवो ॥४॥