भजनी मालिका
← भजनांकडे परत

नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं घनदाट

nandatase nam akash patalin | sarva bhumandalin ghanadat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नांदतसे नाम आकाश पाताळीं । सर्व भूमंडळीं घनदाट ॥१॥ पाताळ फोडोनि किती आहे पुड । नाहीं आंत वाड नभ वरी ॥२॥ चौर्‍यांशी भोगिती दुर्मति पामर । नाहीं सारासार जाणत तें ॥३॥ नामदेव म्हणे नाम अविनाश । तेथें नाना वेष नाम सर्व ॥४॥