भजनी मालिका
← भजनांकडे परत

नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली

nada binda bheti je veli paijali

नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली । ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ॥१॥ उगेची मोहन धरूनी प्रपंची । त्याशी पै यमाची नगरी आहे ॥२॥ जिवजंतू जडत्वासी उपदेशी । त्यासी गर्भवासी घाली देव ॥३॥ मुक्ताई श्रीहरी उपदेशी निवृत्ती । संसार पुढती नाही आम्हा ॥४॥