भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तें सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती

nam ten sar shridharanche vache | koti janmachen dosh jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तें सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती ॥१॥ जपें तूं आवडी धरुनियां गोडी । युगाऐसीं धडी करुनियां ॥२॥ जनार्दनीं एका श्रीधर निजसखा । नोहे तो पारखा जनार्दनीं ॥३॥