भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तेंचि रुप रुप तेंचि नाम । नामरुप भिन्न नाहीं नाहीं

nam tenchi rup rup tenchi nam | namarup bhinna nahin nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम तेंचि रुप रुप तेंचि नाम । नामरुप भिन्न नाहीं नाहीं ॥१॥ देव आकारला नामरुपा आला । म्हणोनि स्थापिला नामवेदीं ॥२॥ नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥३॥ नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले ॥४॥