भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम पावन तिही लोकीं । मुक्त झालें महा पातकी

nam pavan tihi lokin | mukta jhalen maha pataki

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम पावन तिही लोकीं । मुक्त झालें महा पातकी ॥१॥ नाम श्रेष्ठांचें हें श्रेष्ठ । नाम जपे तो वरिष्ठ ॥२॥ नाम जपे नीलकंठ । वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ ॥३॥ नाम जपे हनुमंत । तेणे अंगीं शक्तिवंत ॥४॥ नाम जपे पुंडलीक । उभा वैकुंठनायक ॥५॥ नाम ध्यानीं मनीं देखा । जपे जनार्दनीं एका ॥६॥