भजनी मालिका

भजने

ध्यानाचे ध्यान ज्ञानाचें ज्ञान । ते सम चरण विटेवरी ॥१॥ भावाचा तो भाव देवाचा तो देव । वैकुंठीचा राव विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ध्यानीं चिंतनी मानसीं । हरितें ध्याता अहर्निशीं । तोचि होऊनिया भक्तरासी । झाले विठठलिं विठ्ठल ॥१॥ कीटकी भृंगी ऐशी रुप । तीव्र ध्यानें ते तद्रुप । विष्णु जेवीं शिवस्वरुप । शिवहि विष्णु चिंतनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ध्यानीं रंगले मानस । जिव्हें नावांचा उल्हास । कीर्तन आवडे श्रवणांस । नेत्रही स्वरुपास भाळलें ॥१॥ वाचा लांचावली गुणा । तुमच्या नामसंकीर्तना । देह घाली लोटांगणा । मस्तक चरणां सोकावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥ योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचें ॥१॥ झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥ पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

न करी आळस रामनाम घेतां । वाचे उच्चारितां काय वेंचे ॥१॥ न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांहीं । रामनाम गाई सदा मुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न करी सायास आणिक संकल्प । वायांचि विकल्प न धरी मनीं ॥१॥ मनाचें जें मन करी ते स्वाधीन । तेणें नारायण कृपा करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

न करू आह्मीं तैसें घेईं आतां भाक । अंतरीं नि:शंक झालो सर्व ॥१॥ तुह्मीं आह्मां साक्षी असे सदाशीव । येथें दुजा भाव धरूं नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न कळतां मुलांसंगें मी खेळत । गेलों सभेआंत राजयाच्या ॥१॥ काय सांगों माये जाहला अपमान । तेणें माझें मन । दुखावलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

न कळती भावेवीण रामकृष्ण । गोपिकांसी शीण बहुतची ॥१॥ बहुत मिळती बहुतांच्या मतां । तैशां गोपी तत्त्वतां शिणताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ