भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा

dhyey dhyata dhyan viththal sampurna | dnyey dnyata purna viththal majha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥ योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥ उन्मनी समाधी विठ्ठल बोला वाणी । तारील निर्वाणीं विठ्ठल माझा ॥३॥ मज भरंवसा कायामनेंवाचा । एक जनार्दनीं त्याचा शरणांगत ॥४॥