भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यानीं रंगले मानस । जिव्हें नावांचा उल्हास । कीर्तन आवडे श्रवणांस । नेत्रही स्वरुपास भाळलें

dhyanin rangale manas | jivhen navancha ulhas | kirtan avade shravanans | netrahi svarupas bhalalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ध्यानीं रंगले मानस । जिव्हें नावांचा उल्हास । कीर्तन आवडे श्रवणांस । नेत्रही स्वरुपास भाळलें ॥१॥ वाचा लांचावली गुणा । तुमच्या नामसंकीर्तना । देह घाली लोटांगणा । मस्तक चरणां सोकावला ॥२॥ ऐसीं अवघीच अवघ्या ठायीं । पडलीं तुमचिये प्रवाहीं । तुम्हावीण दुजें कांही । कोणा नाठवे सर्वथा ॥३॥ देखिलें तें विटेवरी । राहिलें डोळियांभीतरीं । तें अवघिया एकचि सरी । वेधूनियां ठेविलें ॥४॥ निळा म्हणे नव्हे आतां । पालट केलियाही सर्वथा । नामें रुपें पंढरीनाथा । लाविले पंथा आपुलिया ॥५॥