भजनी मालिका
← भजनांकडे परत

न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे

na kari alas jay pandharisi | avaghi sukharashi tethen ahe

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥ पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥ कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥ पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥