भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्यानाचे ध्यान ज्ञानाचें ज्ञान । ते सम चरण विटेवरी

dhyanache dhyan dnyanachen dnyan | te sam charan vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ध्यानाचे ध्यान ज्ञानाचें ज्ञान । ते सम चरण विटेवरी ॥१॥ भावाचा तो भाव देवाचा तो देव । वैकुंठीचा राव विटेवरी ॥२॥ कामाचा तो काम योगियां विश्राम । धामाचा तो धाम विटेवरी ॥३॥ वैराग्याचे वैराग्य मुक्तांचे माह्गेर । तो देव सर्वेश्वर विटेवरी ॥४॥ भोळीयाचा भोळा ज्ञानीयाचा डोळा । एका जनार्दनीं सोहळा विटेवरी ॥५॥