भजनी मालिका

भजने

धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी । नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों ॥१॥ दुसरी न करावी बाईल । भंड फजिती होईल । बोभाट वेसदारा जाईल । बायकाच्या पाणवथ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धरींरे मना तूं विश्वास या नामीं । अखंड रामनामीं ओळखी धरीं ॥१॥ जप करीं अखंद खंडेना । निशिदिनीं मना होय जागा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धरुनि हातीं हात पोरा धरिसी चिकाटी । न सुटेसि मग बाळिया सांपडता मुष्टी ॥१॥ धरिसी तरी धरि एक हरी चित्तीं मनीं । नाहीं तरी अहंकार गोविल वेसनिं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरुनियां श्वास पोटीं सेवो पहासी हाल । न पवसी स्थळ भोंवतां गडियांचा मेळ ॥१॥ हुतुतु हुतुतु किती करिसी वेळोवेळां । होऊनियां नम्र भजे घननीळ सांवळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

धरोनि हस्तक बैससी एकांतीं । भक्तासी श्रीपती सर्वकाळ ॥१॥ दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण धांवे नेटें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥ कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥ कळेल तैसें करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

धर्मशास्त्री ऐसें बोलताती बोलें । तेणें चोजवलें चित्त त्याचें ॥१॥ आश्चर्याच्या डोहीं बुडाला पारधी । म्हणे कैसी बुद्धि याची पहा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धर्माचें वाट मोडे । अधर्माची शीग चढे । तैं आम्हां येणें घडे । संसारस्थिती ॥१॥ आम्हां कां ससारा येणें । हरिभक्ति नामस्मरणें । जडजीव उद्धरणें । नामस्मरणें करुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज ॥१॥ विठोबाचे गांवा न्यारे एकवेळां । फार आहळला जीव माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धामणगांवामध्यें माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥ विठोबाचे नामीं रंगलें हें मन । मिळालें जीवन सिंधुमाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव