भजनी मालिका
← भजनांकडे परत

धाडाल तेथें जाईन देवा । सांगाल सेवा तेचि करीन

dhadal tethen jain deva | sangal seva techi karin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धाडाल तेथें जाईन देवा । सांगाल सेवा तेचि करीन ॥१॥ लेवलाव तें लेईन लेणें । मिरवीन भूषणें कराल तें ॥२॥ सांगाल तेंचि ऐकेन गोष्टी । धरुनियां पोटीं राहेन अर्थ ॥३॥ निळा म्हणे येईन मागे । तुम्ही न्याल संगें त्याचि स्थळां ॥४॥