भजनी मालिका
← भजनांकडे परत

धर्मशिळे आली राणी ऋषि दचकला मनीं

dharmashile ali rani rushi dachakala manin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धर्मशिळे आली राणी ऋषि दचकला मनीं ।। १।। अनि विझवोनीं अंगें। सतीपुढे आला रागें ॥ २ ॥ म्हणे कवणाची कवण | अग्नि खासी कवण्या गुणें ||३|| येरी म्हणे पांथिकातें। पति बाळ चुकलें मातें ।।४।। तुम्हीं असतील देखिलें मज सांगा जी पहिले ||५|| ऋषि बोले लागून मेले अग्नीत जळून ||६|| तारामती नेउनी तेथे दाखविलीं दोन्हीं प्रेतें ।।७।। त्वचा अंगीची जळाली हात पाय गोळा झालीं।।८।। देखे नृपाचें तें मढ़ें। पाहे वल्लभा मजकडे ।।९।। रुसूं नका बोला वेगें। गुजगोष्टी मजसंगें ॥१०॥ रोहिदास कवळी पोटीं । लावी लल्लाट लल्लाटी ।।११।। शोक करी तारामती अस्त झाला तो गमस्ती ।।१२।। प्रेत कवळी कां निर्फळ गेला गेला हंसनीळ ॥१३॥ आतां प्राप्त झाली निशी व्याघ्र भक्षील तिघांसी ।। १४ ।। सति पुढोनियां प्रेत नेलें ओढोनी परत ।। १५ ।। उदर फोडोनी त्वरित । टाकियेलें काढुनी आर्त ।।१६।। रामें गुरगुरी तो जाणा। भय दावी क्षणक्षणां ।। १७।। येरी नेत्र झांकियेले पंचप्राण आकर्षिले ||१८|| तारामती सांडील प्राण । लटिकें प्रतिज्ञा वचन ।।१९।। पतिपुत्र दोघेजण आला घेउनी ब्राह्मण ॥२०॥ नाहीं व्याघ्र ना वणवा । मृगजळाचा हेलावा ।। २१ ।। तिघेंजर्णे एक झालीं। दासी जनी आनंदली ॥२२॥