भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज

dhanuniyan mithi ghalin santacharanin | sangen vachanin maninche guj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज ॥१॥ विठोबाचे गांवा न्यारे एकवेळां । फार आहळला जीव माझा ॥२॥ आनंदाचें जीवन पाहेन श्रीमुख । शोक मोह दु;ख हरती माझे ॥३॥ विटेसहित चरण देईन आलिंगनु । तेणें माझी तनु ओल्हावेल ॥४॥ तुझी आवडते हरीचें अंतरंग । माझे जीवलग प्राणसखे ॥५॥ नामा म्हणे विठोबा कृपेची माउली । तेव्हां ते साउली करील मज ॥६॥