देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं
dev mhane namya visoba khecharasi | sharan tayasi javen vegin
देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥ इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥
dev mhane namya visoba khecharasi | sharan tayasi javen vegin
देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥ इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥
dev mhane namya vyapar barava kela | damasheti tula ragavati
देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥ जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥
dev mhane naradasi | jay nirmala tirthasi
देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥ तीर्थ निर्मळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥२॥
dev mhane bhaktaraja | avher majha na karava
देव म्हणे भक्तराजा । अव्हेर माझा न करावा ॥१॥ भोजनकाळीं पाचारावें । मजही घ्यावें सांगातें ॥२॥
dev mhane bhaktaho kanhi tari ghyare | te mhanati ure shinachi ghetan
देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥ याल तरि नेईन वैकुंठलोकां । ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥
dev mhane bhaktansi avadi | mi jahalon tumacha gadi
देव म्हणे भक्तांसी आवडी । मी जाहलों तुमचा गडी ॥१॥ सांगाल तें करीन काम । मजवर ठेवा तुमचें प्रेम ॥२॥
dev mhane rahanen na ghadechi yethen | jave atan pudhaten udyogasi
देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी ॥१॥ निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा । जाऊं जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥
dev mhane sanvatya lapavi majala | ushir bahu jahala yeil chor
देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥
dev rakhe taya maril kon | na mode kanta hindatan van
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥
dev rukmabai anik sadhujan | kariti samadhan nivrutichen
देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥ ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥
dev vase chittin | tyachi ghadavi sangati
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥
dev vase pandharisi | yeti sanakadik rushi | vandoni pudanlikasi | charan vanditi viththalache
देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥ करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडीं ॥२॥
dev viththal tirtha viththal | avagha viththal bharalase
देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥ जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥
dev visarala devapanasi | dekhoni bhaktansi bhulala
देव विसरला देवपणासी । देखोनी भक्तांसी भुलला ॥१॥ नावडेचि वैकुंठ धाम । तो निष्काम कीर्तनीं नाचतो ॥२॥
dev vaikunthicha
देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा भार फेडिला भूमीचा ।
dev shivacha avatar | jauni basala gadavar
देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ।। एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।।
dev sakha atan kelen navhe kai | yenen sakalai soirin cha
देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥१॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥
dev sakha jari | jag avaghen krupa kari
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥
dev sant donhin ekachi mel | gadarol kirtani
देव संत दोन्हीं एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी ॥१॥ ती हे त्रिवेण पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥
dev sarvathayin vase | pari na dise abhavikan
देव सर्वाठायीं वसे । परि न दिसे अभाविकां ॥१॥ जळीं स्थळीं पाषाणीं भरला । रिता ठाव कोठें उरला ॥२॥