भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च

dev sakha atan kelen navhe kai | yenen sakalai soirin cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥१॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥ अविनाश जोडी आम्हां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥ पायांवरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥ तुका म्हणे जीव पावला विसावा । म्हणवितां देवा तुमचींसीं ॥५॥