भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी

dev mhane naradasi | jay nirmala tirthasi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥ तीर्थ निर्मळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥२॥ नारदाची नारदी सरी । धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥ चोखा म्हणे हेंचि देई । स्नान घडो तये ठायीं ॥४॥