भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं

dev mhane namya visoba khecharasi | sharan tayasi javen vegin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी । शरण तयासी जावें वेगीं ॥१॥ इतुकें ऐकोनि नमियेलें देवा । चालयेलाअ तेव्हां विसोबापाशीं ॥२॥ चिंताग्रस्त नामा आला आंवढयासी । पुढें देऊळासी देखियेलें ॥३॥ नामा तये काळीं गेला देऊळासीं । देउळीं कौतुकासी देखियेलें ॥४॥