भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी

dev mhane rahanen na ghadechi yethen | jave atan pudhaten udyogasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव म्हणे राहणें न घडेचि येथें । जावे आतां पुढतें उद्योगासी ॥१॥ निवृत्तिराज म्हणे शुद्ध प्रतिपदा । जाऊं जी गोविंदा प्रतिष्ठाना ॥२॥ अनादि जें स्थळ दाविलें नारायणें । मन प्रतिष्ठाना येते जहाले ॥३॥ चक्रतीर्थीं पोहा म्हणती आला थोर । वैष्णवांचे भार उतरले ॥४॥ नामा म्हणे हरी सहज आली वाट । आपेगांव कोठें सांगा स्वामी ॥५॥