भजनी मालिका

भजने

देव देहीं आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे ॥१॥ ऐसें ते भुलले देवा विसरले । तपताती वहिले करुनी कष्ट ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव धांवे मागें न करी आळस । सांडितां भवपाश मायाजाळ ॥१॥ सर्वभावें जें कां शरण रिघती । तयांचें वोझें श्रीपती अंगें वाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव नसतां भक्तांचीं विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें ॥१॥ कोणासी म्हणते धांवा धांवा । करितां कुडावा कोण दुजा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥ नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कलवलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देव पाहतां मजमाजीं भेटला । संदेह फिटला सर्व माझा ॥१॥ माझा मीच देव माझा मीच देव । सांगितला भाव श्रीगुरुनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥ दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव प्रसन्न जाला माग म्हणे वहिला । भक्त घरोघरीं विचार पुसों गेला ॥१॥ भाव कीं भ्रांति आळस की भक्ती । विचारुनी व्यक्ति ठायीं ठेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा ॥१॥ आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देव भक्त दोनी करिताती काला । तयांच्या सुखाला वर्णी कवण ॥१॥ धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचें । ठेवणें सदाशिवाचें खेळतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ