भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी

dev nivrutti yanni dharile donhi kar | jato dnyaneshvar samadhisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥ नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कलवलें ॥२॥ दाही दिशा धुंद उदयास्ताविण । तैसेंचि गगन कालवलें ॥३॥ जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥ ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥ तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥ भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥ नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥