भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्त एके ठायी । संतमेळ तया गांवीं

dev bhakta eke thayi | santamel taya ganvin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव भक्त एके ठायी । संतमेळ तया गांवीं ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । देव उभा विटेवर ॥२॥ भक्त येती लोटांगणीं । देव पुरवी मनोरथ मनीं ॥३॥ धांवे सामोरा तयासी । आलिगुन क्षेम पुसीं ॥४॥ ऐशी आवडी मानी मोठी । एका जनार्दनीं घाली मिठी ॥५॥